Uncategorized

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतले, खंडोबा देवाचे दर्शन.

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतले, खंडोबा देवाचे दर्शन.
जेजुरी, वार्ताहर
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज जेजुरी येथील खंडोबा देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत सुनिलभाऊ जगताप, एकनाथ आंबले उपस्थित होते.आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे खंडोबाच्या गडावर आले होते. यावेळी यांचे पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, मार्तंड देवसंस्थानचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, सेकंडरी बँकेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले,पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव दत्तात्रय रोकडे ,पुरंदर तालुका काँग्रेस सेलचे अध्यक्ष प्रल्हाद गिरमे,सामाजिक कार्यकर्ते शामराव दरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
“आपण खंडोबाच्या दर्शनासाठी आणि आशिर्वादासाठी आलो असून, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यांनी तळी भंडारही केला. त्याच बरोबर जेजुरी येथील देवाची खंडा म्हणजेच तलवारही उचलली. तसेच त्यांनी जिजामाता हायस्कल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाला भेट देवून शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी याच्याशी हितगुज साधले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button