गरजू विद्यार्थ्यांना श्री मार्तंड देवसंस्थानकडून गणवेश वाटप

गरजू विद्यार्थ्यांना श्री मार्तंड देवसंस्थानकडून गणवेश वाटप
जेजुरी येथील जनता शिक्षण संस्थेच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर या शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना श्री मार्तंड देवसंस्थानच्या माध्यमातून शालेय, स्पोर्ट्स तसेच आर.एस.पी. गणवेशाचे वाटप करण्यात आले.
हा गणवेश वितरणाचा कार्यक्रम श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य युवराज घोळवे सर, ज्येष्ठ शिक्षक नेवसे सर, पर्यवेक्षक ठाकरे सर, तसेच शिंदे सर, गिरमे सर, यजगर सर, ताकवले सर, कोकणे सर, जगताप सर, बाबळे सर, दरेकर मॅडम, जगताप मॅडम, गायकवाड मॅडम, तांबे सर आदी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शाळेचे प्राचार्य युवराज घोळवे सर यांनी गरजू विद्यार्थ्यांना केलेल्या सहकार्याबद्दल श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.
तसेच ॲड. पांडुरंग थोरवे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाला जीवनात सर्वोच्च महत्त्व देऊन मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाच्या माध्यमातून मिळालेली ही मदत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे


