

“ओबीसी बहुजन आघाडी या राजकीय पक्षास निवडणूक आयोगाची मान्यता”
महाराष्ट्रातील तमाम ओबीसींचे विश्वासार्ह नेतृत्व माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होत असलेल्या “ओबीसी बहुजन आघाडी” या राजकीय पक्ष निवडणूक आयोगाने दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत मान्यता दिली आहे.
ओबीसी बहुजन आघाडीचा कायम नोंदणी क्रमांक SEC/UPP/OBC/२०२५/१४ असा आहे.
महाराष्ट्रातील ओबीसींनी यापूर्वी कधीही मतपेटीची लढाई लढली नसल्याने ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय न्याय संविधानिक न्याय हक्कावर इतरांनी गदा आणली आहे. आपल्या भावी पिढ्यांच्या संविधानिक न्याय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राजकीय लढाई म्हणून ओबीसी बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी परिषदेत माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मधील महाराष्ट्रातील सर्वच जागांवर ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार असल्याचे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी जाहीर केले.
या पक्षाच्या नोंदणी कामी कोल्हापूर जिल्ह्यातील ओबीसी जनमोर्चाचे नेते दिगंबर लोहार एकनाथ कुंभार यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले.
सदरच्या राज्यस्तरीय ओबीसी परिषदेत महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, लातूर येथील माजी मुख्याध्यापक व ओबीसी नेते लक्ष्मण दावणकर, अमरावती येथील प्रवीण पटेकर यवतमाळ मधून ज्ञानेश्वर गोरे विलास काळे, नागपूरचे रमेश पिसे, साताऱ्याचे भारत लोकरे, सुरेश कोरडे, अनिल लोहार, सांगली मधून डॉ.सुशांत कोळेकर, प्रमिला साळी, औंध पुणे येथून पांडुरंग मेरगळ आदींसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो ओबीसी नेते उपस्थित होते.


