धक्कादायक! माऊली नगर (जेजुरी) येथे टेम्पोची दुचाकीला धडक… तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ..तर एक जण जखमी

धक्कादायक पुरंदर तालुक्यात टेम्पो व दुचाकी वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू तर एक जण जखमी पुरंदर तालुक्यातील घटना…

नमस्कार, पुरंदर तालुक्यातील जेजुरी बारामती मार्गावर असलेल्या माऊली नगर येथील मेघ मल्हार हॉटेल समोर एका आयशर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल वरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून तर एक जण जखमी झाला आहे याबाबत सतीश प्रकाश खैरे. राहणार नाझरे. कप खैरेवाडी यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन येथून माहितीनुसार माहितीनुसार राहुल अशोक पवार वय 30 राहणार नाझरे कप पवारवाडी हा त्याच्याकडे मोटरसायकल क्रमांक (एम.एच12 ईई4553) व फिर्यादी हे हॉटेल मातोश्री येथे जेवण करून मोरगाव बाजूकडून जेजुरी बाजूकडे जात असताना माऊली नगर येथे भरभाव आलेल्या आयशर टेम्पो एम एच 42 बी एफ 5022 ने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली.

या अपघातात राहुल अशोक पवार हा गंभीर जखमी झाला तर सतीश खैरे यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र गंभीर जखमी असल्याने यातील युवक राहुल पवार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 304 अ 259, 337, 338, 427 व मो.वा.का. कलम 184, 134, व 177 नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मदने व पोलीस हवालदार हाके करत आहेत.



