
रक्षाबंधन साठी गेलेल्या बहिणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू…..

नमस्कार पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील वैशाली नितीन शेंडगे, वय 26 वर्ष सध्या राहणार हडपसर ,मंतरवाडी तालुका हवेली या रक्षाबंधन निमित्त बोरी भडक चंदनवाडी तालुका दौंड येथे आपल्या भावाकडे गेल्या होत्या,

त्यावेळी त्यांचे भाऊ विलास कोपनर वय 34 वर्ष हे त्यांना आपल्या दुचाकी वर बोरीबडक इथे जाण्याकडे निघाले असताना सोलापूर बाजू कडून येणाऱ्या एका भरभाव चार चाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात दोन्ही भाऊ बहिणींना जबरदस्त मार लागला. तर महिलेच्या डोक्याला हाता पायाला गंभीर मार लागल्या मुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या. मात्र तेथील लोकांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलून त्यांना उपचार करता दाखल केले. मात्र उपचार चालू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी सदर महिलेचे भाऊ विलास कोपनर यांनी याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सदर चार चाकी वाहन चालक मोहन रावसाहेब डोंबे, राहणार खोर राहणार डोंबेवाडी यांच्यावर कलम 279 79 337 338 304 व मोटार वाहन अपघात नियम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. रक्षा बंधन निमित्त गेलेल्या बहिणीवरच काळाने घाला घातल्याने सदर परिसरात हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये नायगाव येथे सदर तरुणी वरती अंत्यसंस्कार करण्यात आले.



