Uncategorized

ब्रेकिंग न्यूज !माजी आमदार विजय शिवतारे तातडीने मुंबईकडे रवाना…..!

ब्रेकिंग न्यूज !विजय शिवतारे तातडीने मुंबईकडे रवाना…..!

नमस्कार, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासह नऊ जणांचा शपथविधी पार पडला होता. मात्र एक आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी अजूनही खातेवाटप जाहीर झाले नाही. येणाऱ्या पावसाळी अधिवेशन च्या तोंडावर खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तार करा. असा आग्रह भाजप सह शिंदे गटाच्या आमदारांनी धरल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे बोलले जात असून, आज सायंकाळी साडेपाचच्या विमानाने उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रफुल पटेल हे दिल्लीकडे रवाना होत असून तिथे भाजप श्रेष्ठींची त्यांची चर्चा होणार आहे. यातच एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप मिळाल्यानंतर तातडीने पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे मुंबईकडे रवाना झाले आहेत. विजय शिवतारे हे शरद पवार यांचे कट्टर राजकीय वैरी मानले जातात. बारामतीची लोकसभेची जागा जिंकायचीच त्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. अशावेळी मंत्रिमंडळाच्या होणाऱ्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button