जेजुरी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, अनैतिक संबंधातून केलेल्या खुनाचा दोन तासात केला उलगडा.

जेजुरी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी अनैतिक संबंधातून केलेल्या खुनाचा दोन तासात केला उलगडा.

नमस्कार, पुरंदर तालुक्यातील पिंपरे गावच्या हद्दीत बेंद वस्ती कडे जाणाऱ्या रोड लगत कॅनलच्या बाजूला हरिश्चंद्र बजरंग थोपटे या 42 वर्षे इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत मयताचा भाऊ सतीश थोपटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता . पोलिसांनी सदर गुन्ह्याबाबत वेगाने चक्र फिरवली असता धक्दायक माहिती समोर आली . सदर खून अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी याप्रकरणी सुमारे दहा आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे. जेजुरी पोलिसांनी गुन्ह्याची माहिती कळतात अवघ्या दोन तासात अवघ्या दोन तासात या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
गोपनीय बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी १)प्रणव राजेंद्र डावरे राहणार पाडेगाव ता. खंडाळा तालुका जिल्हा सातारा याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मयत याची पत्नी २)पूजा हरिश्चंद्र थोपटे हिच्या मदतीने आरोपी ३)धीरज उर्फ बंटी संजय डावरे ४) निकेश वीरेंद्रसिंह ठाकूर राहणार सासवड व त्याचे इतर सर्व साथीदार ५) सुरेश कांतीलाल कडाळे राहणार पाडेगाव ६) सिद्धांत संभाजी भोसले राहणार जेजुरी ७) लखन बाळाजी सूर्यवंशी यांच्याबरोबर कट रचून व सुपारी देऊन मयत हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा खून केला व त्यांना त्यांचे साथीदार स्वरूप रामदास जाधव, विशाल रूपचंद चव्हाण व शुभम सचिन मचारे यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. वरील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभागाचे आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपविभागीय अधिकारी भोर विभाग सासवड तानाजी बरडे यांच्या सूचनेनुसार जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, पोलीस निरीक्षक एन एच सोनवलकर,म पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार, उपनिरीक्षक पीएम गावडे, उपनिरीक्षक आर. एम.साबळे, उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, सहाय्यक फौजदार चंद्रकांत झेंडे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत मोकाशी, पोलीस हवालदार विठ्ठल कदम पोलीस हवालदार बनसोडे, पोलीस हवालदार अण्णासाहेब देशमुख, पोलीस हवालदार संजय ढमाळ, महिला पोलीस हवालदार रेणुका पवार, पोलीस नाईक निलेश करे, पोलीस नाईक संदीप भापकर पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शेंडे,. पोलीस कॉन्स्टेबल अमोल महाडिक,. पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार पोलीस हवालदार भरत आरडे पोलीस हवालदार विनोद हाके, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भोर यांच्या कार्यालयातील पोलीस हवालदार विशाल रासकर,. पोलीस नाईक सोमेश राऊत, पोलीस हवालदार निलेश सटाले,. तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.स.ई ननावरे, पोलीस हवालदार कांचन पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव, पोलीस हवालदार कारंडे व पोलीस मित्र नाना घोगरे यांनी केली आहे.



