जेजुरी नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले.. नऊ वर्षानंतर होणार पुन्हा नगरपरिषद निवडणुका! नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता कायम?

जेजुरी नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर ….जाणून घ्या संपूर्ण माहिती…



नमस्कार, गेली अडीच ते तीन वर्ष प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता होणार असून त्याच्या अनुषंगाने सुरुवात झाली असून सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत प्रभाग रचना जाहीर केली. यावर 31 ऑगस्ट पर्यंत सूचना व हरकती नोंदविण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर आता निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून नऊवर्षाच्या कालखंडानंतर निवडणुका होणार असल्याने पुन्हा एकदा जेजुरी मध्ये निवडणुकीच्या चर्चेला जोर धरला आहे.प्रभाग रचना जाहीर झाली आहे या प्रभाग रचनेनुसार जेजुरी नगर परिषदेमध्ये 20 नगरसेवक असणार असून गेल्या वेळेच्या तुलनेत ही संख्या तीन ने नगरसेवक वाढले असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झालेले नसल्याने नगराध्यक्ष पदाचा सस्पेन्स कायम आहे.तर एकूण 10 प्रवर्गात 20 नगरसेवकांची संख्या असणार असून जाणून घेऊया प्रत्येक प्रभागाची माहिती व्याप्ती व आरक्षण.
वीस सदस्य असलेल्या या नगर परिषदेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असल्यामुळे दहा जागेवर महिला सदस्य दिसणार आहेत. प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेनुसार 20 सदस्यांपैकी तीन सदस्य अनुसूचित जाती प्रवर्गातील असून यात दोन महिला सदस्य एक पुरुष सदस्य तसेच पाच सदस्य हे ओबीसी प्रवर्गातले असणार आहेत. त्यातील तीन सदस्य महिला व दोन सदस्य पुरुष असतील. उर्वरित जागेपैकी पाच जागेसाठी महिला आरक्षण असणार आहे. प्रभाग घोषणा प्रसिद्ध होताच इच्छुकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.


