
डॉ. प्रसाद सुधाकर खंडागळे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
डॉ प्रसाद खंडागळे हे तळागाळातील माणसांसाठी मदत करणारे तपस्वी व्यक्तिमत्त्व
प्राचार्य नंदकुमार सागर
जेजुरी वार्ताहर
दिनांक 5
कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठान, जेजुरी यांच्या वतीने सामाजिक ,धार्मिक,शैक्षनिक ,आरोग्य, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. प्रसाद सुधाकर खंडागळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.डॉ प्रसाद खंडागळे हे तळागाळातील माणसांना मदत करणारे तपस्वी व्यक्तिमत्त्व आहे असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांनी व्यक्त केले
सावंत प्रतिष्ठानच्या वतीनेसोमवार, दिनांक 5 रोजी आयोजित समारंभात प्रदान डॉ प्रसाद खंडागळे यांना प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. प्रसाद सुधाकर खंडागळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत पीएचडी करून उद्योग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील गरजू, गरीब व वंचित घटकांसाठी सातत्याने आरोग्यसेवा,शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या खिशातून सर्व सामान्य माणसांना मदत केली.जागतिक स्तरावर मोठ्या पदावर काम करतांना सतत ग्रामीण भागातील माणसांसाठी त्यांनी काम केले.एक शास्त्रज्ञ म्हणून पुणे विद्यापीठ,व पुण्यातील अनेक कॉलेज मध्ये ते काम करत आहेत असे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी हभप नारायण महाराज गोसावी,डॉ नितीन केंजळे ,प्रकाश खाडे,बी एम काळे,प्रसाद अत्रे,जीसाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उबाळे यांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक अतुल सावंत,कुंडलिक भोसले,नीलम खंडागळे,रसिक जोशी ,पुष्कर खाडे सर्व खंडागळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेजुरी देवसंस्थान चे माजी विश्वस्त नितीन राऊत आभार मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संजय सावंत,संतोष सावंत,प्रल्हाद गिरमे,मयूर सावंत आदींनी केले.
फोटो पाठविला आहे.
जेजुरीच्या सावंत प्रतिष्ठानच्या वतीने शास्त्रज्ञ डॉ प्रसाद खंडागळे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करताना.


