BREAKING! राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का ? पहा आत्ताची सर्वात मोठी बातमी!

BREAKING! राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का ? पहा आत्ताची सर्वात मोठी बातमी!
नमस्कार, गेले काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वांना धक्का देत सरकारमध्ये सामील होत विरोधी पक्षनेते पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज प्रथमच अजित पवार सह त्यांच्या सह गेलेल्या मंत्र्यांनी अचानकच शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगला येथे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदार व मंत्र्यांना सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. मात्र त्याचवेळी वाय बी सेंटर येथे शरद पवार हे बैठकीनिमित्त आल्याचे कळताच सर्व आमदार व मंत्री तिथे रवाना झाले. व तिथे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे उपस्थित होते.
या भेटीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रफुल्ल पटेल असे म्हणाले. की आम्ही शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला व राष्ट्रवादी पुन्हा एकत्र करा असा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष एकत्र कसा राहील याविषयी मार्गदर्शन करण्याबाबत विनंती केली. मात्र यावर शरद पवार यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र या घडामोडीची माहिती मिळताच तातडीने जितेंद्र आव्हाड व जयंत पाटील हे देखील वाय बी सेंटर येथे दाखल झाले. मात्र अचानक झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.



