धक्कादायक !जेजुरी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांच्यावर जीवघेणा हल्ला… उपचारादरम्यान मृत्यू.

धक्कादायक! जेजुरी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांची कुराडी व कोयत्याने वार करून हत्या…
जेजुरीतून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. जेजुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक व प्रसिद्ध व्यापारी मेहबूबभाई पानसरे यांची जमिनीच्या वादातून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने जेजुरी शहर व पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार मेहबूब पानसरे, यांनी जेजुरी जवळील मौजे धालेवाडी गावात काही शेत जमीन खरेदी केली होती त्या जमिनीच्या वादातूनच वणेश प्रल्हाद परदेशी, किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, व त्यांच्या इतर पाच साथीदारांनी मेहबूब पानसरे व त्यांच्याबरोबरवर असलेल्या दोघांवरती कुर्हाडीने व कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी मेहबूब पानसरे यांच्याबरोबर असलेल्या साजिद मुलाणी हे सुद्धा त्या हल्ल्यात डाव्या हाताच्या पंजास वार बसून जखमी झाले. यावेळी मेहबूब पानसरे यांच्याबरोबर राजू पानसरे हे देखील होते. यात त्यांच्यावर अनेक वार झाल्याने त्यांना तात्काळ जेजुरीतील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले मात्र परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. पुणे येथे सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाची बातमी जेजुरीत वाऱ्यासारखी पसरली व एकच खळबळ उडाली. जेजुरीतील एक प्रसिद्ध व्यापारी तसेच एक समाजसेवक म्हणून प्रसिद्ध होते. मनमिळावू स्वभाव यामुळे त्यांनी संपूर्ण जेजुरीत आपले वेगळेच स्थान निर्माण केले होते. कोणत्याही संकटाला धावून येणारे चाचा अशीच त्यांची ख्याती होती. मेहबूब पानसरे हे नेहमीच धार्मिक कार्यात अग्रेसर असत. त्यांच्या जाण्याने जेजुरी वासियांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र प्रवाह न्यूज तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली……



