विशेषशहरसामाजिक
Trending

तुंबलेल्या गटारामुळे विद्यानगरकडे जाणारा रस्ता पुन्हा पाण्याखाली

तुंबलेल्या गटारामुळे विद्यानगरकडे जाणारा रस्ता पुन्हा पाण्याखाली

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी :जेजुरी शहरातील विद्यानगरकडे जाणाऱ्या प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यावर तुंबलेल्या गटाराचे पाणी थेट रस्त्यावर साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार हीच समस्या उद्भवत असून, संबंधित यंत्रणांकडून ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आज मकर संक्रांतीचा सण असल्याने महिलावर्ग सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतो. मात्र रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे पादचाऱ्यांना तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, दुर्गंधीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
या समस्येबाबत यापूर्वीही अनेक वेळा प्रसारमाध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या असून, नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व ठोस उपाययोजनांची मागणी केली . मात्र केवळ तात्पुरती साफसफाई करून विषयावर पडदा टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
सणासुदीच्या दिवशी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, संबंधित नगरपरिषद व प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात अपघात व आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button