जेजुरीत आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या
जेजुरी, दिनांक. १ जेजुरी येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे राहणाऱ्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
या संदर्भात जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अण्णाभाऊ साठे नगर येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी दि. १ सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. तीचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. आई वडील घरात नसताना या मुलीने केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास जेजुरी पोलिसा ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश नांदे हे करीत आहेत.



