महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयदीप बारभाई यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर… पारंपारिक सामना रंगणार का…???

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जयदीप बारभाई यांना उमेदवारी जाहीर… पारंपारिक सामना रंगणार का…???

नमस्कार, बरेच मोठे कालखंडानंतर नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होऊन दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जेजुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाकडून साठी कोणाला उमेदवारी मिळणार यावरून आता पडदा उठला असून दिलीप दादा बारभाई यांचे पुत्र माजी नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष जयदीप बारभाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नुकतेच पुणे येथे राष्ट्रवादी भवन येथे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्या होत्या. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेकजण इच्छुक होते.मात्र आज सकाळी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत माझी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी जयदीप बारभाई यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. व ज्येष्ठ नेते रोहिदास भाऊ कुंभार व बाळासाहेब सातभाई यांनी त्यास अनुमोदन दिल्यामुळे अखेर अजित पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी जयदिप बारभाई यांची उमेदवारी घोषित केली असून आता भाजपकडून उमेदवार कोण असेल. याबाबत उत्सुक्य वाढले असून जेजुरी करांना पुन्हा एकदा पारंपारिक सामना बघायला मिळणार का अशी उत्सुकता सामान्य जनतेमध्ये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button