Uncategorizedमहाराष्ट्र
Trending

जेजुरी येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा पाहणी दौरा

जेजुरी येथे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा पाहणी दौरा

मयुर कुदळे

जेजुरी प्रतिनिधी :

२१ डिसेंबर रोजी जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर दुपारी ४ वाजता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जेजुरी येथे भेट देत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी दौरा केला.
या पाहणीदरम्यान जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी शहरातील प्रमुख चौक, वाहतूक व्यवस्था, जमाव नियंत्रण तसेच बंदोबस्ताच्या उपाययोजनांची तपासणी केली.
निवडणूक निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जेजुरीत शांततामय वातावरण राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button