महाराष्ट्रविशेषशहर

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना ..समाजकार्यातून गावाचा विकास करतो? या रागातून एकाचा खून तर इतर गंभीर जखमी….

पुरंदर तालुक्यातील खळबळजनक घटना ..समाजकार्यातून गावाचा विकास करतो? या रागातून एकाचा खून तर इतर गंभीर जखमी….

नमस्कार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे रावडेवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मौजे गराडे रावडेवाडी ग्रामपंचायतच्या सदस्य असलेल्या सुप्रिया विशाल रावडे व सचिन दिलीप रावडे हे दोघे गावांमध्ये समाजकार्य करून विकास कामे करत होते याचाच राग मनात धरून जमावाने केलेल्या महाराणीत एकाचा मृत्यू तर इतर जण जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे .याबाबत मिळालेली सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 29 सप्टेंबर रोजी मौजे गराडे रावडेवाडी येथे सायंकाळी सात वाजता तक्रारदार विशाल गोकुळ रावडे व इतर लोक गावातील चौकात थांबलेले असताना सागर भानुदास रावडे ,शशिकांत भानुदास रावडे, संदीप सदाशिव रावडे ,बाळासो सदाशिव रावडे, अमर सखाराम रावडे, उमेश ज्ञानोबा रावडे, ज्ञानेश्वर वामन रावडे, सोमनाथ उर्फ बाबू हनुमंत रावडे, दत्तात्रय वामन रावडे ,सुंदराबाई सखाराम रावडे, सारिका श्रीरंग रावडे, बेबी हनुमंत रावडे, पारूबाई भानुदास रावडे ही सर्वजण राहणार गराडे रावडेवाडी हे त्या ठिकाणी आले. व त्यापैकी शशिकांत भानुदास रावडे यांनी हातात तलवार व इतरांनी हातात चाकू, काठ्या, लोखंडी राँड व महिलांनी मिरची पावडर होती .चारी मैदानी हातातील मिरची पावडर फिर्यादीच्या डोळ्यात टाकत असताना फिर्यादींनी डोळे बंद केले त्याचवेळी सचिन दिलीप रावडे हा आडवा आल्याने आरोपी शशिकांत रावडे यांनी त्यास तुला विशालचा लय पुळका आला आहे का ..त्याला का वाचवतोस तुला आता जिवंत सोडत नाही असे बोलून शशिकांत रावडे व बाळासाहेब रावडे हे यांना संपून टाका असे म्हणाले त्यावेळी आरोपी शशिकांत रावडे आणि त्याच्या हातातील धारदार तलवारीने सचिन दिलीप रावडे यांच्या पाठीमागे उजव्या बाजूस व खालच्या भागात तलवारी खूपसली व सागर भानुदास रावडे, दीपक सदाशिवरावडे, बाळासाहेब सदाशिव रावडे ,ज्ञानेश्वर वामनरावडे, अमर सखाराम रावडे, सोमनाथ हनुमंत रावडे दत्तात्रय वामनरावडे यांनी मिळून हाच विशालला वाचवतो याला संपून टाका असे म्हटले.लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मोठ्याने आरडाओरडा करत दशत माजवून तिथं उभी असलेली नवनाथ रावडे यांची चार चाकी इको गाडीची तोडफोड करून काचा फोडल्या. जखमींना औषध उपचार कामी शासकीय रुग्णालया सासवड येथे डॉक्टरने तपासणी करून सचिन दिलीप रावडे हे मयत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर सुप्रिया विशाल रावडे यांनी सदर प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून सदर 13 पैकी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे व उर्वरित सहा रोपींना अटक करण्यासाठी सासवड पोलीस स्टेशन यांच्याकडे दोन पोलीस पथके रवाना झाली आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवडचे तानाजी बरडे, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप राजगड पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महानगडे ,बाजीराव ढेकळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस हवालदार रुपेश भगत, लियाकत अली मुजावर, गणेश पोटे, जब्बार सय्यद ,किसन कानतोडे ,निलेश जाधव ,सुहास लाटणे, सुरज नांगरे, भगवान थोरवे, विक्रम भोर ,रमेश करचे प्रतीक धीवार, संजय दाने, हेमा भुजबळ यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button