महाराष्ट्र
Trending

सासवड एसटी स्टँड येथे मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला…..

सासवड येथे महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला रंगेहाथ पकडले…

नमस्कार सासवड एसटी बस स्थानक येथे एका महिलेच्या सतर्कतेमुळे मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न फसला आहे.

सदर महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार लक्षात येताच तिला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर हकीकत अशी की शशिकला नारायण कुंजीर वय 72 वर्ष या सासवड एसटी स्थानक इथे बस मध्ये चढत असताना सविता गोविंद अवताडे वय 40 वर्ष मूळ राहणार आष्टा कासार जिल्हा उस्मानाबाद या महिलेने त्यांचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. असा आरोप फिर्यादी यांनी केला आहे

मात्र हा प्रकार लक्षात येताच शशिकला कुंजीर यांनी त्यास पकडून सासवड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


या संपूर्ण प्रकारावरून सासवड पोलिसांनी सदर महिला ही संशयित असल्याने तिच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 379, 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा शेगार व म. पो. ना. भुजबळ करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button