दिलीप बारभाई यांना बरोबर घेऊनच जेजुरी नगरपालिका लढा:कार्यकर्त्यांना सूचना. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार

दिलीप बारभाई यांना बरोबर घेऊनच जेजुरी नगरपालिका लढा
कार्यकर्त्यांना सूचना
– उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
जेजुरी दि.१(प्रतिनिधी : मयूर कुदळे )
येऊ घातलेल्या जेजुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जेजुरीतील जेष्ठ नेते दिलीप दादा बारभाई यांना बरोबर घेऊन लढवल्या जाणार असल्याचे सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले आहे जेजुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) जेष्ठ नेते व पवार कुटुंबियांचे निष्ठावंत असलेले दिलीप दादा बारभाई यांना बरोबर घेऊनच जेजुरी नगरपालिकेची निवडणूक लढवली जाईल असे अजित पवार यांनी जेजुरी येथील कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान सांगितले अजित पवार हे सोमेश्वर साखर कारखान्याची सभा उरकून जेजुरी येथे खास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांनी बारभाई यांना बरोबर घेऊन व ते सांगतिल त्या प्रकारे निवडणूक लढवावी अशा सुचना दिल्या असल्याचे माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, कात्रज दुध संघाचे उपाध्यक्ष तानजी जगताप यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक तथा विरोध पक्षनेते जयदिप बारभाई,जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रमेश लेंडे, जेजुरी शहर शिवसेना प्रमुख विठ्ठल सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष रमेश बयास, मुकुंद बेलसरे,माजी नगरसेवक भारत शेरे,एन. डी. जगताप, हरिभाऊ बोधले, गणेश मुंडलिक, वैभव कोरपड, योगेश जगताप,सुशिल राऊत, संजय शेवाळे,माजी नगराध्यक्षा साधना दिडभाई,दिलीप दोडके, सनी झगडे, आकाश भोसले,संतोष निंबाळकर, सागर भोसले, किशोर भगत, नारायण जाधव,समीर मोरे, शिवाजी जगताप, मयुरेश लेंडे, माधव बारभाई, बाळासाहेब गोसावी,शेखर बारभाई, प्रशांत लाखे, समीर मुलाणी, नजीर शेख, विजय खोमणे, राजेंद्र जावळेकर, हुसेन पानसरे , साहेबराव कुदळे, गणेश खोमणे, अभिजित कुदळे,राजू पानसरे, तुषार दरेकर, सागर दरेकर, बाळासाहेब खोमणे,दिलीप आगलावे,सादिक बागवान ,छबन कुदळे,घनशाम लाखे,आदि मान्यवर व ग्रामस्थ, बारा बलुतेदार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


