जेजुरी देवसंस्थानच्या वतीने सुमारे 52 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन

जेजुरी देवसंस्थानच्या वतीने सुमारे 52 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन
हिंदूधर्मरक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय भवनाचां समावेश
आज शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने हिंदू धर्मरक्षक पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय भवन,मल्हार सृष्टी प्रकल्प,अन्नदान इमारत व दर्शन मंडप या सुमारे 52 कोटी रुपये खर्चाच्या नियोजित वास्तूंचे भूमिपूजन करण्यात आले.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठावर सुमारे दीड एकर जागेत राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुद्देशीय भवन उभारले जात आहे. यात पहिल्या टप्प्यात 17 कोटी रुपये रुपये खर्चून पौराणिक व ऐतिहासिक वस्तू संग्रालय,सांस्कृतिक सभागृह,ग्रंथालय,भक्त निवास या कामांचा सहभाग आहे.
हे भूमिपूजन देवसंस्थान च्या विश्वस्त मंडळाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड विश्वास पानसे, डॉ राजेंद्र खेडेकर,अनिल सौंडदे, ॲड.पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, व्यवस्थापक आशिष बाठे, तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जेजुरी तीर्थक्षेत्र आराखडा अंतर्गत शासनाच्या वतीने सुमारे 349 कोटी रुपयांची असून देवसंस्थानच्या या सुमारे 52 कोटी रुपयांच्या कामांची भर पडणार आहे.
तसेच श्री खंडोबा मंदिर गडकोटाच्या पूर्वे कडील डोंगर रांगेत श्री खंडोबा देवाचा सर्व माहितीपट असणारी भव्य मल्हार सृष्टी निर्माण करण्यासाठी सदरील जागेमध्ये भूमिपूजन करण्यात आले.
तसेच भव्य अन्नदान कक्षाचे, भव्य दर्शन मंडपाचे देखील भूमिपूजन करून विविध विकास कामाना सुरुवात करण्यात आली.


