महाराष्ट्र
Trending

“बाईपण भारी देवा” या चित्रपटाला जेजुरीमध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद

“बाई पण भारी देवा” चित्रपटाला जेजुरी मध्ये महिलांचा प्रचंड प्रतिसाद!

नमस्कार, भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये मराठी चित्रपट सृष्टीला एक वेगळे स्थान आहे. अगदी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ एका मराठी व्यक्तीनेच रचली होती. अलीकडच्या काळात मराठी चित्रपट सृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे व ते कमाईची सुद्धा नवनवीन विक्रम करत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटाने २०१६ साली असाच विक्रम केला होता. असाच एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या मराठी चित्रपटाचे नाव आहे “बाई पण भारी देवा” ३० जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आणि पहिल्याच दिवसा पासूनच या चित्रपटाची क्रेझ तयार होऊ लागली. तर एकाच दिवसात या चित्रपटाने सुमारे साडेसहा कोटीच्या वर कमाई करत एक नवीनच विक्रम रचला. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील पाच ज्येष्ठ अभिनेत्रीने आपल्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात स्त्री या व्यक्तीरेखेला मध्यवर्ती ठेवत केदार शिंदे यांनी स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यातील भावनिक घालमेल प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री ही जन्मापासूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते. व तिला या प्रत्येक वळणावर कायम दुय्यम भूमिका जगण्यास भाग पाडले जाते. व संपूर्ण आयुष्यात कर्तव्यनिष्ठा करत राहत असल्याने तिचे स्वतःचे आयुष्य तिला जगता येतच नाही असा काहीसा संवेदनशील विषय या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

महाराष्ट्रातील सर्व थेटरमध्ये हा चित्रपट सध्या तुफान गर्दी खेचत आहे. जेजुरी मधील स्वामी समर्थ चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला.आणि पहिल्या दिवसापासूनच महिलांनी या चित्रपटासाठी प्रचंड गर्दी केली. अगदी रात्री नऊ ते बारा चा शो सुद्धा हाउसफुल झाल्याने सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू झाली. जेजुरी व आसपासच्या ग्रामीण भागातील महिला तसेच अगदी सासवड पर्यंत ते नीरा,लोणंद पर्यंत असणाऱ्या महिला वर्गाने हा चित्रपटासाठी हजेरी लावली आहे. एकूणच येणाऱ्या काळात हा चित्रपट विक्रम करेल यात शंकाच नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button