महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
Trending

जेजुरीत बंधन संस्थेच्या वतीने निराधार महिलांना रोजगारासाठी साहित्य वाटप.

जेजुरीत बंधन संस्थेच्या वतीने निराधार महिलांना रोजगारासाठी साहित्य वाटप.

(मयुर कुदळे ): महिला सक्षमीकरण झालं पाहिजे,या हेतूने बंधन कोन्नगर संस्था व बजाज फिन्सर्व यांच्या सहकार्याने जेजुरीत 20 महिलांना रोजगार साहित्याचे वाटप करण्यात आले.

दिनांक 29 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या कार्यालयात सदर कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वीस निराधार महिलांना कपडे, बांगडीचे साहित्य, किराणा साहित्य, पूजा साहित्य फळे आणि भाजीपाला असे व्यवसाय महिलांसाठी देण्यात आले आहेत. भाजीपाला व फळे विकणाऱ्या महिलांना वजन काटे सुद्धा देण्यात आले आहेत तसेच या महिलांना आधीच दहा हजार रुपयांचे व्यवसाय देण्यात आले आहेत.

बंधन बजाज संस्था पुणे जिल्ह्यातील 2000 निराधार महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या हेतूने बजाज फिन्सव सहकार्याने काम करत आहे. आजपर्यंत जेजुरी शाखेच्या वतीने 130 निराधार महिलांना रोजगार देण्यात आला आहे व नोव्हेंबर महिन्यात आणखी 70 महिलांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्या व्यतिरिक्त, बंधन संस्था नियतकालिक प्रशिक्षण आणि गट बैठकीद्वारे मार्गदर्शन सुद्धा देते. बंधन 2006 पासून ही संस्था चालवीत असून एकूण 14 राज्यांमध्ये वीस लाख महिलांना रोजगार दिला आहे.

जेजुरी येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे, भटक्या विमुक्त आघाडीचे रवी काका खोमणे, प्रसिद्ध उद्योजक विजय शेठ झगडे, उद्योजक नवनाथ चौंडकर, नीता दोडके (पो. ह) प्रीतम सोनवणे (पो. ह) धनश्री कासेकर (पो. ह) संपदा खोमणे (सामाजिक कार्यकर्त्या ) बंधन संस्थेचे अधिकारी राजेंद्र घोशाल, अमृता घोष (वरिष्ठ व्यवस्थापक ) योगेंद्र कुमार (क्षेत्र प्रभारी ) भागीरथ दास (शाखा व्यवस्थापक), सोनल अडसूळ, स्नेहा खेसे,ऐश्वर्या मेमाने उपस्थित होते. जेजुरीतील जास्तीत जास्त महिलांनी संस्थेच्या कार्यालयाला भेट द्यावी. व लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button