Uncategorized

बारामती शहर पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी.. छाप्यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह कार जप्त…

बारामती शहर पोलिसाची महत्वपूर्ण कामगिरी. छाप्यात कारसह गुटखा जप्त
बारामती शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई करत एका कारसह लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. बारामती शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कदम चौक या ठिकाणी एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा आहे. सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांच्या तपास पथकाने त्या ठिकाणी छापा मारला असता सिल्वर रंगाची इंडिका कार MH 12EN 9159 उभी असल्याचे दिसून आली. तिची तपासणी केली असता त्या ठिकाणी पांढऱ्या पोत्यामध्ये V1 आर एम डी गुलाम व इतर गुटखा ब्रँडच्या गुटखा पुड्या मिळाल्या. त्यानंतर त्या ठिकाणी लगेच गुरुकृपा किराणा स्टोअर्स दुकान चेक केले असता त्या दुकानात सुद्धा गुटक्याचे माल मिळाला. त्याचबरोबर टॅंगो दारूच्या 96 नग सदर ठिकाणी मिळाल्या. पोलिसांनी विमल, गुलाम, आर एम डी, V1 तसेच सुगंधी तंबाखू किंमत 27 हजार 322रुपये टॅंगोच्या दारू किंमत सहा हजार सातशे वीस रुपये व गुटखा विक्रीतून आलेले रोख 900260 रुपये एक लाख 24 हजार रुपये किमतीचा गुटखा दारू व रोख व तीन लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. सदरचा गुटखा आणणारे व विक्री करणारे शंकर उर्फ अक्षय राजू धोत्रे राहणार. पतंग शहा नगर, नागे संतोष दावड राहणार पतंग शाह नगर यांना अटक करण्यात आली. सदर ठिकाणावरून आतिश राजू धोत्रे हा फरारी झाला .सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई तुषार चव्हाण, पोलीस शिपाई अक्षय सिताफळ, दशरथ इंगोले पोलीस हवालदार शिंदे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button