जेजुरी येथे सोमवती यात्रा पालखी सोहळा बैठक संपन्न! पहा सविस्तर…..

|| सोमवती उत्सव पालखी सोहळा ||
सोमवार दिनांक २० फेब्रुवारी२०२३ रोजी खंडोबा देवाचा सोमवती अमावस्या पालखी सोहळा पार पडणार असून खंडोबा गडावरून पालखी सोहळा उस्तवमूर्तींसह कऱ्हास्नानासाठी सोमवारी सकाळी ७ वाजता वाजत गाजत निघेल असा हुकूम मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे यांनी दिला . तसेच दुपारी बारा वाजता कर्हा नदीवर कर्हा स्नानाचा धार्मिक विधी होईल.पालखी मंदिरा मध्ये आल्यावर पेशव्यांच्या हस्ते रोजमारा वाटप होऊन पालखीची सांगता होईल.
सदर पालखी सोहळ्याची मीटिंग ही छत्रीच्या मंदिरात पार पडली . यावेळी ग्रामस्थ, खांदेकरी ,मानकरी उपस्थित होते.
सदर मिटिंगला मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे , खान्देकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर नाना खोमणे पाटील , श्री रामभाऊ माळवदकर पाटील , मा विश्वस्थ पंकज निकुडे पाटिल , मा विश्वस्थ शिवराज झगडे , मा विश्वस्थ सुधीर भाऊ गोडसे , मा विश्वस्त संदीप आप्पा जगताप , हेमंत शेठ सोनवणे , राजाभाऊ चौधरी , गणेश आगलावे , पत्रकार नितीन राऊत सर , पत्रकार प्रकाश फाळके , कुंडलिक दावलकर , बळवंत पेशवे , विठ्ठल शेठ सोनवणे , पोलीस अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप,सतीश घाडगे , गणेश शेठ डिखले , अरुण आण्णा खोमणे , बुरुड समाज अध्यक्ष माणिकराव पवार , सुभाष काका राऊत , शैलेश राऊत , अमोल शिंदे , राहुल दोडके , नितिन काका खेडेकर , रोहिदास जगताप , भारत शेरे पाटिल , अनिल झगडे , गुरुजी नितिन काका पुरोहित , अशोक खोमणे , वसंत शिंदे , संतोष आबा खोमणे पाटील , कृष्णा काका कुदळे , छबन कुदळे , पंडित बापू हरपळे , माऊली खोमणे , काळूराम थोरात , काशिनाथ मोरे , रोहिदास माळवदकर पाटिल , सौरभ सकट , सागर प्रभाळे , सुशील राऊत , सागर हरपळे , भालेराव , निशाण मानकरी दोडके , भालदार मोरे तसेच समस्त ग्रामस्थ खान्देकरी मानकरी उपस्थित होते .


