“केवळ बारामतीचा विकास हा मोह आवरा! इतर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात मोठा प्रकल्प आणला का???” विजय शिवतारे यांचे सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र…

“केवळ बारामतीचा विकास हा मोह आवरा! इतर तालुक्यात गेल्या पन्नास वर्षात मोठा प्रकल्प आणला का???” विजय शिवतारे यांचे सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र…
माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पत्राच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. हे पत्र समाज माध्यमात वायरल झाले असून या पत्रात त्यांनी अनेक सवाल बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना केले आहेत. यावेळी विषय आहे राज्य विमा महा मंडळाच्या बारामतीत होणाऱ्या नियोजित हॉस्पिटलचा.ESI कायद्यानुसार कामगाराच्या वेतनातील काही ठराविक रक्कम कपात केली जाऊ लागली आणि या रकमेतून देशभर ESIC हॉस्पिटल उभारून मोफत वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात झाली .शिवतारे यांनी म्हटल्याप्रमाणे नुकतेच बारामती तालुक्यात 100 बेडचे हॉस्पिटल मंजूर केल्याचे समजले आहे. मात्रे हॉस्पिटल बारामतीलाच का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या पन्नास वर्षात भोर ,मुळशी ,पुरंदर ,दौंड, इंदापूर हवेली या तालुक्यासाठी आपण कोणताही मोठा प्रकल्प आणलात का? शेकडो कोटी खर्चून आपण बारामतीत मेडिकल कॉलेज मंजूर केले बाजूलाच आणखी पाचशे बेडचे रुग्णालय उभारले. तसेच सिल्वर जुबली सारखे उपजिल्हा रुग्णालय उभे केले. शासनाच्या या सर्व वैद्यकीय सुविधा एकाच तालुक्यात व एकाच शहरात… ही बाब काही योग्य नाही.
तसेच बारामतीत होणाऱ्या या नियोजित हॉस्पिटल मुळे काही अडचणी निर्माण होणार असल्याचे त्यांनी या पत्रात निदर्शनास आणून दिले. चाकण किंवा भोरच्या कामगारांनी बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये 140 किलोमीटर एवढ्या लांब यावे अशी आपली अपेक्षा आहे का? तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी एवढा लांब पल्ला गाठावा का.. तसेच या हॉस्पिटल साठी लागणारे तज्ञ वैद्यकीय व्यावसायिक व सर्जन मुंबई पुण्याला वास्तव्य असतात. त्यांना सातत्याने बारामतीला शेकडो किलोमीटर प्रॅक्टिकली ये जा करणे शक्य आहे का…
तसेच त्यांनी या पत्रद्वारे असे आव्हान दिले आहे की दौंड, भोर ,पुरंदर ,मुळशी किंवा हवेली तालुक्यात या होस्टेल साठी जागा उपलब्ध करून देण्याची तयारी माझी आहे. मात्र तुम्ही बारामती केंद्रित राजकारणाला मुरड घालावी व इतर तालुक्यामध्ये हे हॉस्पिटल करावे. त्यामुळे त्या तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या संबंधित मुला मुलींना रोजगार मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.


