Uncategorized

“जेजुरीतील नंदी चौक ते सातारा नाका रस्ता डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करावा”राष्ट्रवादीची मागणी.

“नंदी चौक ते सातारा नाका हा रस्ता डांबरीकरण न करता कॉंक्रिटीकरण व्हावा त्याचबरोबर दोन्ही बाजूने पिण्याच्या पाण्याची लाईन टाकावी. तसेच ड्रेनेज लाईन ही नवीन टाकावी तसेच स्ट्रीट लाईट ही टाकाव्यात” असे स्थानिक नागरिकांच्या सह्याचे पत्र तसेच नगरसेविका साधनाताई प्रशांत लाखे यांच्या अर्जाबरोबर जोडून जेजुरी नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते जयदीप बारभाई, .एन.डी. नाना जगताप, संजयजी शेवाळे जेजुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष वैभव कोरफड ,माधव बारभाई व उद्योजक .प्रशांतजी लाखे या सर्वांच्या हस्ते जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांना देण्यात आले …. यावेळी जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी .चारुदत्त इंगोले यांनी असे आश्वासन दिले की याचा लवकरात लवकर पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावले जाईल कारण मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांना कमीत कमी त्रास व्हावा. व तेथील राहणाऱ्या नागरिकांची गेल्या पाच ते सहा वर्षात होणाऱ्या त्रासापासून सुटका व्हावी. या करता हे काम लवकरात लवकर करून देण्याचे आश्वासन दिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button