महाराष्ट्र
Trending

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू…अभ्यासाच्या ताणाचा परिणाम!

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू… अभ्यासाच्या ताणाचा परिणाम!
नमस्कार सध्याची युग हे स्पर्धात्मक असून आपली मुले ही अभ्यासात कायम पुढे असावेत असे प्रत्येक पालकांना वाटत असते. व त्याच दृष्टिकोनातून सध्या मुलांवर अभ्यासाचा प्रचंड तणाव येत आहे. शाळा, ट्युशन इतर स्पर्धात्मक परीक्षा इत्यादीचा अभ्यास करता करता विद्यार्थी अक्षरश घाईला येत आहेत. मात्र या अभ्यासाच्या प्रचंड ताणा मुळेच बीड मधील एका नववीच्या विद्यार्थ्यांना वर्गातच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बीड शहरातील बशीरगंज भागातील एका प्राध्यापकाची मुलगी शेख रमजान इरफान ही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. मात्र वर्गात असतानाच साडेअकरा वाजता तिने डेस्क वर मान टाकली .तिला तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र तिथे तपासून तिला मृत घोषित करण्यात आले. या संदर्भात मुलीच्या वडिलांशी बोलले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. माझ्या मुलीचे बाबतीत जो दुर्दैवी प्रकार झाला तो कोणाच्याही बाबतीत घडू नये अशी प्रत्येकी या मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. मुलीचा मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत ही मुलगी होमवर्क करत होती. यावरून अशी दिसते की सध्याचे विद्यार्थी हे अभ्यासाच्या प्रचंड तणावाखाली आहेत. शाळा ट्युशन नंतर शाळेचा अभ्यास वेगळा, ट्युशन चा अभ्यास वेगळा रविवारची क्लासेसला सुट्टी नसणे या सर्व व्यापातून मुलांची प्रचंड धावपळ होत आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांना यशस्वी बनताना पाहायचे असल्याने पालक आपल्या मुलांच्या मागे प्रचंड तणाव निर्माण करत आहेत. मात्र या वयात त्यांना हा तणाव झेपत नसल्याचे या घटनेवरून निदर्शनास येत आहे.

आता पालकांनी सुद्धा या घटनेतून बोध घेऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आपली मुले यंत्र झाली आहेत का? मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त मैदानी खेळ व इतर गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे याची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button