विशेष
Trending

जेजुरी पोलिसांची रोड रोमियोवरती धडक कारवाई…

जेजुरी पोलिसांची रोड रोमियोवरती धडक कारवाई…

नमस्कार, जेजुरी शहरात शिक्षणासाठी दररोज जेजुरी शहर परिसर व शेजारच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी येत असतात. मात्र जेजुरी शहरातील शाळा व कॉलेजच्या बाहेर शाळा सुटणेच्या वेळेस महाविद्यालयीन तरुण तसेच टवळखोर हे आपल्या दुचाकीवरून ट्रिपल सीट चालवणे, वाहन वेगात चालवणे, तसेच मोठमोठ आवाजात हॉर्न वाजवून लोकांना त्रास होईल असे वर्तन करणे, इत्यादीच्या तक्रारी जेजुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आज अचानक दुपारी साडेअकराच्या दरम्यान जेजुरी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर ,पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस उपनिरीक्षक साबळे, सहाय्यक फौजदार उदय पवार ,पोलीस हवालदार अण्णा देशमुख, पोलीस नाईक कैलास सरक, तसेच त्यांच्या ईतर स्टाफ ने अचानक जेजुरी शहरातील एका नामांकित विद्यालया बाहेर धडक मोहीम राबवत रोड रोमियोवर कारवाई केली. यात बेशिस्त वाहनानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये मोटर वाहतूक अधिनियम प्रमाणे 31 केसेस दाखल करण्यात आलून असून सुमारे २०,५०० रूपये दंड पासून करण्यात आला आहे. तसेच रोड रोमिओ यांना समज देण्यात आली आहे. तरी यापुढे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये. व यापुढे शाळा महाविद्यालय परिसरात असा प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल व प्रसंगी गुन्हे देखील दाखल केली जातील असे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button