महिलेचा मानसिक व शारीरिक छळ…. सासू व दिरावर गुन्हा दाखल….
महिलेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी सदर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सासू व दिरावरती बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याबाबत हकीकत अशी की सदर महिला ही बारामती शहरातील एका अपार्टमेंट मध्ये राहते. फिर्यादी या दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ज्योतिबा मंदिराकडून घराकडे येत असताना काळ्या रंगाचे एक्टिवावरून फिर्यादी महिलेचा दिर अमित अशोक तनपुरे व सासू रेणुका अशोक तनपुरे हे येत होते. ते फिर्यादीच्या मागे हळूहळू गाडी घेऊन येऊ लागले त्यामुळे फिर्यादी घाबरून घरात निघून गेले. व फिर्यादी गॅलरीत आले असता पुन्हा ती गाडी वळवून मागे आले व महिलेचा दिर महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. त्यामुळे महिला घरात गेल्यानंतर दीर व सासू घरासमोर येवून जोरजोराने हॉर्न वाजवीत होते. तसाच त्यांनी पाच डिसेंबर रोजी देखील पाठलाग केला होता. फिर्यादी महिलेवर दिराची सुरुवातीपासूनच वाईट नजर होती. फिर्यादी महिला सासरी असताना देखील महिलेचा दिर अवेळी बेडरूम मध्ये येऊन सदर महिलेशी अश्लील चाळे करत होता. व हा अधून मधून नेहमी पाठलाग करून पीडित महिलेचा मागवा घेत असतो. त्यामुळे माझ्या मालमत्तेस व जीवितास धोका आहे. अशा स्वरूपाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सदर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम३५४,३.३४ नुसार गुन्हा रजिस्टर केला आहे. सदर प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पवार करत आहेत.