महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक
Trending

आकुर्डीत एमबीए कॉलेज मध्ये “आरंभ २०२४- इंडक्शन प्रोग्राम” आयोजित:-

दिनांक १४/०९/२०२४
आकुर्डीत एमबीए कॉलेज मध्ये “आरंभ २०२४- इंडक्शन प्रोग्राम” आयोजित:-

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक १४/०९/२०२४ रोजी “आरंभ २०२४ – इंडक्शन प्रोग्राम” आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रत्येक घटकाची माहिती व ओळख व्हावी तसेच त्यांना महाविद्यालयाच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता यावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.राजेश मंडलिक (Managing Director & CEO- Secto Spindles India Pvt. Ltd.) व प्रा.अमोल कांबळे (Vishwakarma University, Pune) हे उपस्थित होते. दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्याचा सल्ला दिला. श्री. राजेश मंडलिक यांनी उद्योग व उद्योजकाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच उद्योग क्षेत्रातील गरज या बाबत मार्गदर्शन केले. प्रा.अमोल कांबळे यांनी व्यवसायाचे विश्लेषण कसे करावे व त्यावरून निर्णय कसा घ्यावा हे सांगितले. महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.अजित पतंगे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयासंदर्भात माहिती देऊन प्रत्येक प्राध्यापकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला तसेच अभ्यासक्रमाचा आढावा सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वैभवी अहिवळे व अक्षता माळवतकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रियांका डोशी यांनी केले. कार्यक्रमास एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच प्रा.पूजा प्रजापती, प्रा.प्रणव मुळे, प्रा. अंकिता व्हटकर, ग्रंथपाल सौ. कीर्ती पासलकर, कनिष्ठ लिपिक सौ. मोहिनी कदम,सुमित जगदाळे, सौ.संगीता काळभोर व रामभाऊ मोरमारे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button