महाराष्ट्रविशेषशहर
Trending
जेजुरी शहरात अनंत चतुर्थीचे औचित्य साधत मुस्लिम समाजाकडून दूध वाटप… सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन..
जेजुरी शहरात अनंत चतुर्थीचे औचित्य साधत मुस्लिम समाजाकडून दूध वाटप… सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन..
जेजुरी शहरातील हिंदू व मुस्लिम समाज हा कायमच एकोप्याने राहत आला आहे व वारंवार याची प्रचिती येत असतेच .
आजही अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र आल्याने याचे औचित्य साधत जेजुरी शहरातील मुस्लिम समाजातील बांधवांनी एकत्र येत दूध वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .जेजुरी शहरातील हनुमान तालीम चौकात जेजुरी शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशात घडणाऱ्या विविध घटनांचा संदर्भ घेऊन वातावरण गढूळ होत असतानाच या सामाजिक उपक्रमाने सामाजिक ऐक्याचेच दर्शन घडत आहे.