गोरक्षकांची कामगिरी गोमांस वाहतूक करणारे वाहन पाठलाग करत पकडले… जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..
गोरक्षकांची कामगिरी गोमांस वहातूक करणारे वाहन पकडले… जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..
गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन वाहनाचा पाठलाग करीत गोमांस पकडण्यात गोरक्षकांना यश आले आहे .याबाबत सविस्तर हकीकत अशी की गोरक्षणाचे काम करणारे अभिषेक सुनील मुळे राहणार गणेश पेठ ,गौरव जितेंद्र ठाकूर, प्रतीक प्रकाश बोबडे, ऋत्विक अजित भगत, सागर चंद्रकांत माने सर्व राहणार सिंह रोड पुणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नीरा,तालुका पुरंदर येथील छत्रपती शिवाजी चौकात स्वतःच्या चार चाकी वाहनासह थांबून होते त्या दरम्यान बारामती बाजू कडून इंडिका कार व सेंट्रो कार अशी वाहने छ.शिवाजी चौकातून जेजुरी बाजूकडे जाताना दिसली .असता त्यांनी त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनामधील चालकानी त्यांच्याकडे पाहून वेगाने जेजुरी बाजूकडून घेऊन जाऊ लागली .त्यानंतर त्या चार चाकी चा वाहनांचा पाठलाग करत असताना निरा गावापासून जेजुरी बाजूकडे जवळ नंदन डेअरी समोर ती वाहने थांबण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा त्या दोन वाहनाच्या चालकांनी त्यांच्याकडे वहाने रोडवर थांबून चालू अवस्थेत सोडून देऊन त्या दोन्ही वाहनाच्या चालकांनी झाडाझुडपाचा फायदा घेऊन पसार झाले त्यानंतर गोरक्षकाने या दोन्ही वाहनांच्या जवळ गेले असेल त्यामधून उग्र वास येत असता त्यांनी त्या दोन्ही वहानामध्ये दरवाजा उघडून पाहिले असता त्यामध्ये गोमांस मिळून आले ते गोमांसाची पाणी केले असता ते दोन्ही मिळून अंदाजे दोन लाख 40 हजार किमतीचे प्रति किलो 120 याप्रमाणे दोन हजार किलो दोन टन गोंमास मिळून आले सदर गोंमास कोणताही कायदेशीर वाहतूक परवाना नसताना ते मिळून आले. याबाबत अभिषेक सुनील मुळे यांनी फिर्यादी दिली असून याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 325 ,मोटार वाहन कायदा क्रमांक 192 ,66 ,(1 )86 ,म ,पशु संरक्षण अधि 11,5सी,9ए नुसार गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणाचा तपास सह पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई पुजारी व पो. ह.. खाडे करत आहेत.