जेजुरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई..मोटरसायकली, शेतकऱ्यांच्या मोटारी व करहा नदीवरील बंधाऱ्यांची ढापे चोरणारी टोळी गजाआड करण्यात जेजुरी पोलिसांना यश
जेजुरी पोलिसांनी अत्यंत धडाकेबाज कारवाई करत चोरांच्या टोळीला पकडण्यात यश आले आहे.जेजुरी पोलिसांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने इसम विनायक बापू खोमणे यास तपास कामी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता प्रज्वल काहूर गणेश मदने व इतर साथीदाराच्या मदतीने लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील दोन, सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील एक व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील तीन मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे.तसेच विनायक बापू खोमणे व गणेश मदणे व त्यांच्या इतर साथीदारांनी च्या मदतीने शेतकऱ्यांच्या सुमारे 10 इलेक्ट्रॉनिक मोटरी चोरल्याची कबूल केली आहे. सुमारे 70 हजार रुपये किमतीच्या करा नदीवरील जवळा अर्जुन गावातील 70 ते 80 शेतकऱ्यांनी स्वतःच्या वर्गणीतून बंधाऱ्याचे पाणी आडवण्याकरता बसवलेले एकूण 13 लोखंडी ढापे, अनिकेत सुनील वाघमारे वय वीस वर्षे राहणार कोळविहरे,तसेच तन्मय सुभाष महस्के वय 20 वर्ष रा.नावळी यांनी चोरलेले असल्याकारण अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती,उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे,पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, पोलीस सब इन्स्पेक्टर झेंडे,पोलीस हवालदार दशरथ बनसोडे,विठ्ठल कदम, संदीप भापकर,संजय ढमाळ,मुनीर मुजावर,रेणुका पवार,पोलीस नाईक प्रशांत पवार व पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कोळेकर यांच्या पथकाने केली आहे.