*गणेश विसर्जनाच्या मिरवणुकामध्ये डेजर लाईटचा वापर केल्यास कारवाई करण्याचे संकेत जेजुरी पोलिसांकडून देण्यात आले आहेत. लेझर लाईट या मनुष्याच्या डोळ्यांना घातक असून मिरवणूक बघण्याकरिता आलेल्या नागरिकांना व भाविकांच्या डोळ्यांना या लेझर लाईट मुळे इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गणपती मिरवणुकात शांतता व कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांच्या डोळ्यांना इजा पोहोचू नये यासाठी उपाय योजनेचा भाग म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच या आदेशाचा भंग करून गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये डेजर लाईटचा वापर करताना आढळून आल्यास अशा व्यक्ती ,संस्था, मंडळ ,संचालक यांच्यावर भारतीय न्याय समितीचे कलम 223 प्रमाणे कारवाई करणार असल्याचे जेजुरी पोलिसांकडून कळविण्यात आले आहे*
Related Articles
Check Also
Close