दिनांक १५/०९/२०२४
आकुर्डीत एमबीए कॉलेज मध्ये ‘ऋणानुबंध- माजी विद्यार्थी मेळावा’ आयोजित:-
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक १५/०९/२०२४ रोजी “ऋणानुबंध- माजी विद्यार्थी मेळावा” आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांनी माजी विद्यार्थ्यांची महाविद्यालयाप्रति असलेली आदरभावना या वेळी अधोरेखित केली तसेच विद्यार्थ्यांचे महत्व व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी महाविद्यालयाची कटिबद्धता अधोरेखित केली. महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या बॅचचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी विद्यार्थ्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार साईश्रवण कुमार रेड्डी व अलिशा बागवान या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. पूजा प्रजापती व प्रा. प्रणव मुळे यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा. अजित पतंगे, प्रा. प्रियंका डोशी, प्रा. अंकिता व्हटकर, ग्रंथपाल सौ. कीर्ती पासलकर, कनिष्ठ लिपिक सौ. मोहिनी कदम व सुमित जगदाळे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.