महाराष्ट्रविशेषशहर
Trending

जेजुरीतुन धनगर आरक्षण जागर यात्रेची सुरुवात.. जागरण गोंधळ,बेल भंडारा उधळून खंडोबा देवाला साकडे…. 

जेजुरीतुन धनगर आरक्षण जागर यात्रेची सुरुवात 

जागरण गोंधळ,बेल भंडारा उधळून खंडोबा देवाला साकडे 

जेजुरी दि.४ (प्रतिनिधी) – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी च्या खंडेरायाने सरकारला चांगली सद्बुद्धी देऊन धनगर समाजाला लवकर आरक्षण मिळू दे अशा प्रकारचे साकडे सकल धनगर जमात महाराष्ट्र राज्याच्या वतीने पांडुरंग मेरगळ,विजय गोफणे, शशिकांत तरंगे, रमेशशेठ लेंडे,दिपक बोराडे, भिमराव सातपुते, यशवंत गायके, नवनाथ वाघमारे, गणेश केसकर,योगेश धरम, राजेंद्र बरकडे, माणिकराव चोरमले,संपत कोळेकर, अशोक बरकडे,यशवंत पडळकर, लाला महानवर,धुळा तोरवे, उत्तम लेंडे, नवनाथ खोमणे , संतोष खोमणे, गणेश गाढवे, अनिल लेंडे,आदिनी देवाला जागरण गोंधळ,बेल भंडारा उधळून साकडे घातले.

या जागर यात्रेमध्ये बीड, जालना , लातूर , परळी, राहुरी गेवराई ,नांदेड, सोलापूर , पुणे , सातारा, सांगली,कराड,पंढरपूर, दौंड, बारामती, पुरंदर, आदि भागातून हजारो समाज बांधव उपस्थित होते पारंपरिक गजे ढोल, हालगी,संबळ वाजवत हि जागर यात्रा जेजुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाद्वार रोड मार्गे गडावर गेली गडावर उभारण्यात आलेल्या नरवीर उमाजी नाईक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हि यात्रा मंदिरात पोहोचली मंदिरासमोरील कासवावर सरकारच्या नावाने धनगरी गजे ढोल,संबळ,हालगी वाजवून, तळी उचलून बेल भंडा-याची उधळण करण्यात आली या धनगर आरक्षण जागर यात्रेची सुरुवात कुलदैवत जेजुरी येथून सुरू करण्यात आली असून हि जागर यात्रा बारामती, दौंड, इंदापूर, खंडाळा,फलटण, माळशिरस,वेळापुर मार्गे पंढरपूर येथे जाणार असुन त्याठिकाणी ९ सप्टेंबर रोजी सकल धनगर समाजाच्या वतीने शेकडो समाज बांधव आमरण उपोषणाला बसणार असून राज्यातील सर्वात मोठे राज्यव्यापी धनगर समाजाचे उपोषण होणार असल्याचे पांडुरंग मेरगळ यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button