धक्कादायक !जेजुरी पोलीसांकडून मोरगाव रोड येथून दोन संशयित ताब्यात…
नमस्कार जेजुरी पोलिसांकडून रात्रीची गस्त सुरू असताना (माऊली नगर) मोरगाव रोड येथे रात्री दोनच्या सुमारास दोन संशयित आढळून आले. मात्र ते पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून विचारपूस केली असता एकाचे नाव१) अजीम पीर अहमद शेख वय 27 वर्ष, शिक्षण चौथी, व्यवसाय टेम्पोचालक. राहणार मंमदवाडी. हडपसर पुणे तर दुसरा रविराज गिरीश चौधरी. व्यवसाय .मजुरी राहणार भेकराई बस स्टॉप च्या मागे हडपसर पुणे असे सांगितले, असून त्यांना तुम्ही इथे कशाला आला होता, असे विचारले असता ती उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागले एकूणच संशयास्पद प्रकार वाटल्याने जेजुरी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे कायदेशीर गुन्हा रजिस्टर केला आहे.
सदर प्रकरणाचा तपास सह.पो.नि दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव लक्ष्मण पुजारी व अंमलदार दशरथ बनसोडे करत आहेत.