ब्रेकिंग न्यूज! खंडोबा मंदिर आज पासून भाविकांसाठी दर्शनासाठी सुरू…..
ब्रेकिंग न्यूज …खंडोबा मंदिर आज पासून भाविकांसाठी दर्शनासाठी सुरु…
नमस्कार गेले दोन महिने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद असल्याने जेजुरी देणाऱ्या भाविकांची संख्या खूपच कमी झाल्याने जेजुरीतील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. मात्र आज पासून खंडोबा मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आल्याची माहिती मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी त्यांनी असे सांगितले की आज पासून मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले असून दसऱ्याची तयारी अनुषंगाने पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली असून ,संपूर्ण गडकोट परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून रमण्याचा मार्ग व सुशोभीकरण करण्यात आले आहे. यावेळी दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या खंडा शर्यतीसाठी बक्षीस ठेवण्यात आले असून यावेळी मानकरी व कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. व या खंडा शर्यतीच्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख ,पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तसेच जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर उपस्थित राहणार आहेत.
जेजुरीतील भक्तनिवास येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे,विश्वस्त मंगेश घोणे, विश्वासराव पानसे, पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर व अनिल सौंदाडे तसेच मार्तंड देवस्थानचे व्यवस्थापक राजेंद्र जगताप उपस्थित होते.