जेजुरी पोलिसांची वेश्या व्यवसायावर कारवाई
नमस्कार जेजुरी पोलिसांनी तक्रारवाडी तालुका पुरंदर येथे असणाऱ्या लक्ष्मीनारायण लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी छापा घालत गुप्तरित्या चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी जेजुरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सदर लॉजवर छापा टाकला असता तिथे त्यांना वेश्या व्यवसाय चालू असल्याची आढळून आले. या प्रकरणी त्यांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून जेजुरी पोलिसांनी रमा मुगवेर, रुबीश केशव देश भंडारी व परमेश्वर नागाप्पा शेट गुंडे यांच्यावर अनैतिक मानवी वेश्या व्यवसाय प्रतिबंध कायदा 1956 चे कलम ३,४,५ सह भादवि क ३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लॉजिंग मधील किचन कट्ट्याखाली गुप्त दरवाजा करून आतील बाजूस सदर वेश्या व्यवसाय अत्यंत गुप्त रीतीने सुरू होता. मात्र जेजुरी पोलिसांनी अत्यंत गुप्त पणे सदर चालू असणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणण्यात यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोख रक्कम व दोन मोबाईल जप्त केले आहेत.
याप्रकरणी विकास लक्ष्मण सस्ते पोलीस उपनिरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग यांनी जेजुरी पोलीस स्टेशन येथे येथे फिर्याद दाखल केली असून जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे लीस महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली पवार,गणेश नांदे, प्रवीण शेंडे, विनायक हाके, योगेश चितारे, गणेश गव्हाणे यांनी सदर कामगिरी केली आहे