कौतुकास्पद !बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा बारामती शहर पोलिसांनी तात्काळ लावला शोध..
कौतुकास्पद! बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा बारामती शहर पोलिसांनी तात्काळ लावला शोध..
बारामती शहर पोलिसांनी शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध लावत कौतुकास्पद कामगिरी पार पाडली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की काल दिनांक ७ फेब्रुवारी सकाळी दहाच्या सुमारास बारामती शहरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुली १३ ते १५ वर्ष वयाच्या या घरी आल्या नाहीत .म्हणून त्यांच्या पालकांनी रात्री नऊच्या दरम्यान बारामती शहर पोलीस स्टेशन येथे येऊन चारही अल्पवयीन मुलींना कोणीतरी अद्यात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळून नेले अशी माहिती देताच पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीस तपास सुरू केला .त्या तपासात बारामती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर मुलींची माहिती घेऊन सदरच्या मुली पुणे स्टेशन परिसरात आहेत .अशी तांत्रिक माहिती मिळवून पुणे शहर बंडगार्डन पोलिसांशी संपर्क केला .व बंड गार्डन पोलिसांनी एका तासात दहाच्या सुमारास सदर मुलींना ताब्यात घेतले व लागलीच बारामती पोलिसांनी त्या चारही मुलींना बारामती येथे सुखरूप आणले. व त्या मुलीच्या पालकांच्या ताब्यात दिले. यामुळे त्या पालकांनी पोलिसांचे आभार मानलेले आहेत. सदर कारवाई मध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाडूळे, यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे ,पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व अमंलदार श्रीकांत गोसावी, बापू इंगोले यांनी सदरची कामगिरी केली आहे.