जेजुरी येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.
दिनांक 24/12 /2023 रोजी सकाळी 07/30 वा जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत जेजुरी नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक अनोळखी पुरुष वय 55 ते 60 वर्ष एक अनोळखी पुरुष डोळे अर्धवट उघडे ठेवून मयत अवस्थेत मिळून आला आहे.
रंग गोरा, उंची पाच फूट चार इंच, अंगात काळे रंगाचे जाकीट काळ्या रंगाची पॅन्ट, डोकिस काळे पांढरे वाढलेले केस असून दाढी वाढलेली दिसत आहे. सदर मयताचा नाव व पत्ता समजून येत नाही .सदर चे मयता बाबत म्हाळसाकांत भीमराव भालेराव. रा जेजुरी आनंदनगर यांनी खबर दिली आहे.
त्या वरून जेजुरी पोलीस स्टेशन आकसमत मयत रजिस्टर नंबर 132/ 2023 CRPC 174 प्रमाणे दिनांक 24/ 12/ 2023 रोजी दाखल असून सदर मयताचा पुढील तपास पोलीस नाईक नांदे हे करीत आहेत तरी सदर मयता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी .पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन जेजुरी पोलीस यांच्या कडून करण्यात आले आहे.
संपर्क क्र 02115- 253129