
पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन मध्ये २ ठिकाणी घर फोडी तर एका ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळार्जुन गावामध्ये गुरुवारी पहाटे ३ वाजता चोरट्यांनी जालिंदर मुरलीधर टेकवडे यांच्या घरी चोरी केली. यामध्ये ९ तोळे सोने व ५० भार चांदीची चोरी करण्यात आली असून तसेच रणजीत टेकवडे यांच्या घरातून ५०००रुपयांची चोरी झाली व बबन टेकवडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला.

जेजुरी पोलीस स्टेशनचे पो. निरिक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी चोरीच्या ठिकाणची जवळार्जुन गावांमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्याबरोबर पो. उ. निरीक्षक पुजारी, व बीट अंमलदार भापकर ,व जवळार्जुन गावचे पोलीस पाटील अविनाश राणे उपस्थित होते पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक सांडभोर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.



