विद्यानगर मधील या रस्त्याच्या कामातील अडथळा दूर…शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे यांच्या पाठपुरावाला यश…
विद्यानगर मधील या रस्त्यातील कामाचा अडथळा दूर…शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे यांच्या पाठपुरावाला यश…
जेजुरी विद्यानगर मधील स्टेट बँक ते चासकर सर या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरू असून या रस्त्याच्या कामातील महावितरण चे तीन पोल हे अडथळा ठरत होते. ही बाब स्थानिक नागरिकांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे पोल हटवण्याबाबत विठ्ठल सोनवणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येत मुख्याधिकारी इंगोले यांनी दोनच दिवसात त्या पोल काढण्यासाठी कारवाई केली.
हे पोल काढण्यासाठी जेजुरी नगरपालिकेचे विद्युत विभागाचे शीरगिरे, ,बांधकाम विभागाच्या गाजरे मॅडम, एम एस सी बी चे वायरमन गव्हाणे व ठेकेदार दादासाहेब फडतरे यांच्या मदतीने हे शक्य झाले. तसेच या पोल संदर्भात माजी नगरसेवक योगेश जगताप, वैभव झगडे, आबासाहेब काळाने, महेश देशपांडे, चासकर सर यांनी या संदर्भात सूचना केली होती. सदर विद्युत पोल हटवून नवीन पोल बसल्यामुळे रस्त्यातील अडथळा दूर झाला असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.