शिल्पकार महेंद्र थोपटें यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे अचिव्हर्स 2023 पुरस्कार बहाल.

ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटें यांना पुणे अचिव्हर्स 2023चा सन्मान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पुरस्कार बहाल. देशभरातून भारतीय महापुरुष क्रांतिकारांच्या ऐतिहासिक प्रतिमा साकरणारे प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटें यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथे राज्याचे उपराज्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते त्यांच्या कला शास्त्रातील योगदाना बद्दल पुणे अचिव्हर्स 2023चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी महिला आयोग प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार विलास लांडे, पिंप्रीचिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिहं, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे पत्रकार नितीन शिंदे राहुल तांबुळे आदी मान्यवर उपस्तिथ होते गेली वीस वर्ष सातत्याने आपल्या कला संस्कार कला दालनाच्या माध्यमातून ते शिल्पकला क्षेत्रात आपला नाव लौवकिक टिकवून असून देशभरातून विविधराज्यात विविध महापुरुषांच्या उंच प्रतिमा बनविन्यात त्यांचा हातखंड मानला जातो.

नुकताच महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असा पंचवीस फुटाचा शिव छत्रपती पुतळा साकारला असून येत्या 19फेब्रुवारीला कोकणातील रोहा येथे स्थापन करण्यात येणार आहे राजदंडा धीस्टीत अनोखा शिव पुतळा शिवाजी शहाजी पिता पुत्र भेट शिल्प असे विविध शिल्पसृष्टी प्रकल्प ही त्यांनी साकारले आहेत अनेक पुरुसकारांचा सन्मानही महेंद्र थोपटें यांना मिळालेले आहेत राज्यातील पहिला अत्याधुनिक मार्तंड विजय शिल्प सृष्टी प्रकल्प जयाद्री खोऱ्यात जेजुरी येथे उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले


