जेजुरी येथे चोरट्याने तीन दुकाने फोडली .

जेजुरी शहरातील मोरगाव रोड येथील तीन दुकानात अज्ञात चोरट्यानी फोडली असून तेथील रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली आहे. दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडल्याची कळते.

जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोरगाव रोड येथील लोकसेवा हार्डवेअर अँड मशनरी दुकानाचे शटर चे सेंटर लॉक न तोडता बाजूचे लॉक तोडून पत्रा उचकटून चोरांनी दुकानात प्रवेश करून ड्रावर मधील रोख रक्कम 18 हजार रुपये चोरीला नेल्याची घटना असून त्याचप्रमाणे जय किसान मिल्किंग अँड ऍग्रो सर्विस दुकानातील रोख पाच हजार रुपये रक्कम तसेच एसी फ्लाय हार्डवेअर दुकानातील रोख दोन हजार रुपयांचा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सोपोफौ झेंडे तसेच पोलीस हवालदार मदने करत आहेत.


