जेजुरी येथे बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांकडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास.
जेजुरी येथील मल्हार विला इमारतीतील बंद फ्लॅटचा दरवाजाची कडी कोयंडे तोडून सुमारे एक लाख रुपये चा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे .याबाबत संतोष राजकुमार जगताप वय ३६ यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे जेजुरी पोलीसा दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष राजकुमार जगताप यांच्या फ्लॅट क्रमांक 103 (डी विंग) येथे दिनांक 17 जुलै ते दिनांक 25 जुलै या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फ्लॅटचे दरवाजाची कडी कोयंडे तोडून सुमारे 77 हजार रुपये किमतीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेले असून त्याच्या शेजारील शाम संपत साळुंके डि विंग फ्लॅट क्रमांक 202 यांच्या घरातून सुद्धा तीस हजार रुपये रोख रक्कम आज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे याप्रकरणी जेजुरी पोलिसांकडून भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 305(A )331 (3)331 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई पाटील व पोलीस हवालदार चितारे तपास करत आहेत.