जेजुरी बस स्थानकातील पुरातन वृक्ष वाचवण्यासाठी सहकार्य करू! मुख्याधिकारी :चारुदत्त इंगोले.
एसटी स्थानकातील वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करू: मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले.
जेजुरी एसटी स्थानकातील आवारात असणारे सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड तोडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. सध्या जेजुरी बस स्थानकाचा काया पलट होत असून सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून नवीन स्थानक उभारले जात आहे. मात्र पिंपळ वृक्ष तोडल्याने स्थानिक नागरिक नाराज झाले होते व त्या संदर्भात आज जेजुरी नगरपरिषद मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांची भेट घेतली असता सर्वांनी या वृक्ष तोडल्याबाबत नाराजी व्यक्ती केली. यावेळी सर्वांनी सदर झाडाचे संवर्धन आहे. त्याच ठिकाणी व्हावे अशी मागणी केली. यावर बोलताना मुख्याधिकारी म्हणाले की हा संपूर्णपणे शासकीय प्रकल्प असून हा प्रकल्प थांबवण्याचा किंवा या प्रकल्पात कोणताही बदल करण्याचा अधिकार माझ्याकडे नसून सदर प्राधिकरणाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या तीव्र भावना सदर प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देईन. वृक्ष वाचले पाहिजे या मताशी मी सहमत असून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन ही यावेळी मुख्याधिकारी यांनी दिले. यावेळी ग्रामस्थांनी जेजुरी शहरात पसरलेले साथीचे आजार व त्यावर नगरपालिकेकडून औषध फवारणी व्हावी, अशी मागणी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी यात लक्ष घालू व नागरिकांच्या आरोग्यासाठी कोणतीही निष्काळजीपणा होणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी वंदे मातरम् संघटनेचे अध्यक्ष जहीर मुलाणी, अनिकेत हरपळे ,शेखर ननावरे, रसिक जोशी ,प्रवीण आवळे ,श्रीकांत पवार विक्रम माळवदकर, राजेंद्र शेवाळे,, कुणाल यादव, विजयकुमार हरिश्चंद्रे, पप्पू राऊत,शलाका जोशी, इत्यादी उपस्थित होते.