पालखीच्या पार्श्वभूमीवर बारामती पोलीस स्टेशन कडून जाहीर आव्हान,डीजे वर बंदी!
पालखीच्या पार्श्वभूमीवर बारामती पोलीस स्टेशन कडून जाहीर आव्हान,डीजे वर बंदी!
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिनांक सहा व सात जुलै रोजी बारामती शहरात दाखल होत आहे, या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलीस स्टेशन कडून जाहीर आव्हान करण्यात आले आहे,
पालखी आगमनाच्या दरम्यान बारामती शहरात पालखी मार्गामध्ये कोणी डीजे लावू नये. त्या दरम्यान डीजे लावल्यास डीजे लावणारे संबंधित डीजे मालक यांच्यावर गुन्हे दाखल करून डीजेचे साहित्य जप्त करण्याची कारवाई करून योग्य त्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल .तसेच पालखी मार्गात कोणीही अनधिकृत कमानी उभारून नयेत. तसेच परवानगी घेतलेल्या कमानी, स्टेज यामुळे जर पालखी मार्गात पालखीला अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विशेषतः देशमुख चौकामध्ये अनेक स्टेज, मंडप उभारून तेथे स्पीकर लावले जातात. मागील वर्षी अशा डीजे व स्पीकर मुळे पालखी विश्वस्ताकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती. त्यामुळे अशा ठिकाणी स्पीकर लावताना, परवानगी घेऊनच स्पीकर लावावे. तसेच पालखी आगमनाच्या वेळी संबंधित स्पीकर शक्यतो बंद ठेवण्यात यावेत. असे आवाहन बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले आहे.