जेजुरीत जिजामाता विद्यालयाची दहावी निकालाची परंपरा कायम
( विद्यालयाचा ९९.४७ टक्के निकाल- विशेष श्रेणीत ८७ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत ७७ उत्तीर्ण )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने २७ मे रोजी जाहीर झाला.श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा निकाल ९९.४७ टक्के लागला आहे. पुरंदर तालुक्यात ६५ माध्यमिक विद्यालये आहेत, ४५ विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे.पुरंदर तालुक्यात दहावी बोर्ड परीक्षेसाठी ३१२३ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ३०५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.पुरंदर तालुक्याचा ९७.८८ टक्के लागला असल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली.
जेजुरीतील जिजामाता विद्यालयातून दहावी बोर्ड परीक्षेसाठी १९१ विद्यार्थी बसले होते.१९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातील विशेष श्रेणीत ८७ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत ७७ उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे कु.कापरे नम्रता मंगेश ९३.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम,कु.फंड वैष्णवी दीपक ९१.२० मिळवून विद्यालयात द्वितीय तर कु.पाटील पायल जयंत या विद्यार्थिनीला ९०.६० टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे शिक्षक पर्यवेक्षक सतिश पिसाळ, लीना पायगुडे, बाळासाहेब जगताप,सोनबा दुर्गाडे पोपट राणे, महेश खाडे,राजाराम पिसाळ,सोमनाथ उबाळे,कैलास सोनवणे,वर्षा देसाई,छाया पोटे,पांडुरंग आटोळे,मीना भैरवकर,सागर चव्हाण,कुलदीप साळवे,गणेश भंडलकर,सारिका कामथे,पूनम उबाळे,योगेश घोरपडे,अमित सागर,प्राजक्ता क्षीरसागर,राजश्री भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राचार्य नंदकुमार सागर व सर्व शिक्षकांचे श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप ,सचिव, आमदार संजय जगताप,संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक सनदी अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप,ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त राजवर्धिणीताई जगताप,संस्थेच्या विश्वस्त डॉ.अस्मिताताई जगताप,संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.एम.एस.जाधव,सहसचिव दत्तात्रय गवळी,व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे यांनी अभिनंदन केले.