इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियानाचे आयोजन:-
प्लास्टिक संकलन अभियानाचे आयोजन:-
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये दिनांक २२/०३/२०२४ रोजी महाविद्यालयात स्वच्छता अभियानाअंतर्गत “प्लास्टिक संकलन” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेमार्फत जुलै २०२२ पासून प्लॅस्टिक संकलन हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार शाखा स्तरावर दर महिन्याच्या २२ तारखेला परिसरातील प्लॅस्टिक संकलन करून ते रिसायकलिंग साठी दिले जाते. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय तसेच आसपासच्या परिसरातील प्लास्टिक संकलित केले. आपला परिसर प्लास्टिक मुक्त व्हावा या हेतूने प्लास्टिक संकलन केले जात आहे असे मत महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. अजित पतंगे व प्रा. प्रणव मुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पूजा प्रजापती, प्रा. प्रियंका डोशी, प्रा. अंकिता व्हटकर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.