आकुर्डीतील एमबीए महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न -:
आकुर्डीतील एमबीए महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न -:
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंट, आकुर्डी या महाविद्यालयामध्ये अनंत जल्लोष २०२४ अंतर्गत दिनांक १२/०३/२०२४ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा ग. दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अमित जाधव (स्कूल ऑफ लिबरल आर्टस्,अजिंक्य डॉ.डी.वाय पाटील युनिव्हर्सिटी, पुणे) हे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदना या गाण्याने करण्यात आली.महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या वर्षातील शैक्षणिक कार्याचा आढावा आपल्या प्रात्साविकामध्ये मांडला. डॉ. अमित जाधव यांनी शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची असून इतर कलागुणांना वाव देण्याचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमामध्ये मुलांनी वेगवेगळे नृत्य,गाणी, नाट्य, इत्यादी सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. शैक्षणिक गुणवंत मुलांना मेडल्स आणि सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.तसेच महाविद्यालयात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास पालकांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष खलाटे व प्रा. अजित पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ. रुबी छटवाल व प्रा. सायली शिंदे यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पूजा प्रजापती, प्रा. प्रणव मुळे, प्रा. प्रियंका डोशी, प्रा. अंकिता व्हटकर, सुमित जगदाळे, मोहिनी कदम, कीर्ती पासलकर, संगीता काळभोर, रामभाऊ मोरमारे यांनी परिश्रम घेतले.